SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम

schedule07 Mar 26 person by visibility 134 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. ९ व १० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सोमवार दि. ९ मार्च रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महापालिकेच्या सर्व कायम महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत नूतन नगरसेविकांचा क्रिकेट सामना शास्त्रीनगर मैदानावर होणार आहे.

मंगळवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता केएमसी कॉलेज, दुधाळी येथे महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य, गायन, उखाणे तसेच संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश असून स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना प्रशस्तीपत्रके व बक्षिसे देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या सर्व विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर  रूपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

दरम्यान, महापौर  रूपाराणी निकम यांच्या प्रयत्नातून ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेला सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतचा कार्यक्रम सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रेजेंटा हॉल, रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महापौर  रूपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes