SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

schedule07 Mar 26 person by visibility 85 categoryराज्य

कोल्हापूर : सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा सध्यस्थितीत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना प्रशासनामार्फत इंधन पुरवठा नियमित ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नाही.

 सर्व पेट्रोल पंपांवर नियमानुसार इंधनाचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes