SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!

schedule07 Mar 26 person by visibility 247 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील नामांकित 'केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'ने आपल्या शैक्षणिक मूल्यांशी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल होताच, व्यवस्थापनाने अत्यंत कडक पाऊल उचलत संबंधित प्राध्यापकाला तातडीने निलंबित केले आहे.

केआयटी कॉलेजमधील सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. सौरभ जोशी यांच्याविरोधात एका विद्यार्थिनीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉलेज प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली.

कॉलेजचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी यासंदर्भात माहिती दिली की, "पोलीस तक्रारीची प्रत मिळताच आम्ही विनाविलंब संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियमानुसार अंतर्गत चौकशी समिती (Investigation Committee) देखील नेमण्यात आली आहे."

केआयटी महाविद्यालय हे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेसाठी नेहमीच आग्रही राहिले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अनिष्ट घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश कॉलेज प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात महाविद्यालय पूर्णतः सहकार्य करणार असून, पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes