SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘संविधानाच्या रक्षणासाठी मशाल धगधगत ठेवा’; शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागतविजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न..!NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध!कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू! महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धारहसूर येथील आरोग्य शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणीपुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास‘गोकुळ’मध्ये एकमुखी कारभारासाठीच दूध उत्पादकांचा कौल; विजयानंतर आमदार सतेज पाटील यांची पहिली प्रतिक्रियाजागतिक सांख्यिकी दिन: महत्त्व आणि गरज

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत

schedule20 Oct 26 person by visibility 135 categoryराज्य

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीच्या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना करून देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासमवेत आलेले शिष्टमंडळ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes