SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखालीआपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेबाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज​डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापनापिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता

जाहिरात

 

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखाली

schedule04 Jul 26 person by visibility 122 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या या तुफान माऱ्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असून, ती आता २५ फुटांच्या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

 नदीपात्रातील पाणी वाढल्याने जिल्ह्यातील तब्बल २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 'हाय अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.

 या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या वस्त्या व सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून प्रवास टाळावा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes