SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखालीआपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेबाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज​डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापनापिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता

जाहिरात

 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षा

schedule04 Jul 26 person by visibility 66 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज दि. 30 जून 2026 पर्यंत मागविण्यात आले होते. तरी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा अर्ज केले आहेत, त्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी दुपारी 4.00 ते 5.00 या वेळेत मानव्यशास्त्र इमारत येथे घेण्यात येणार आहे, असे समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी कळविले आहे.

अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी दि. 10 जुलै 2026 पर्यंत प्रवेश अर्ज कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावेत.

 प्रवेश अर्ज केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (0231) 2609371 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes