SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखालीआपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेबाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज​डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापनापिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता

जाहिरात

 

आपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

schedule04 Jul 26 person by visibility 108 categoryराज्य

◼️संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय नियोजन आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामान खात्याने जास्त पावसाचा अंदाज वर्तविल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण सतर्क राहून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक विभागाने सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. निवारा केंद्रे, तात्पुरत्या छावण्या, आरोग्य सेवा, आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांची तयारी पूर्ण ठेवून त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. रस्ते, पूल, बंधारे तसेच अन्य ठिकाणी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळ न दवडता मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चुकीच्या अथवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यकतेनुसार तत्काळ अधिकृत व्हिडिओद्वारे खुलासा प्रसिद्ध करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने आपला प्रतिसाद कालावधी कमी करून नागरिकांना वेळेत मदत मिळेल, यासाठी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी रात्रपाळीतील पथकांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी संपर्क व्यवस्था अधिक गतिमान ठेवावी, असे निर्देश दिले.

बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपआयुक्त (पशुसंवर्धन), तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes