SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावाहैदराबाद येथील भारत समिट मध्ये आमदार सतेज पाटील यांचा सहभागकोल्हापूर महापालिकेच्यावतीने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जिमवर सीलची कारवाईखाकी वर्दीतले संवेदनशील मन! हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत साजरी केली भाऊबीजबालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहहरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांकनिलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोपगांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच...! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा : आमदार राजेश क्षीरसागरमानवतेचा संदेश देणारा जागतिक दयाळूपणा दिन

जाहिरात

 

निलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोप

schedule13 Nov 26 person by visibility 217 categoryगुन्हे

◼️संशयितांचे मोबाईल जप्त करून 'डीवायएसपी'मार्फत सखोल चौकशी करा; ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे आक्रमक मागणी
कोल्हापूर : साके येथील निलेश पाटील यांच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हा अपघात नसून घातपात असल्याचा तीव्र संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी संशयितांचे मोबाईल तात्काळ जप्त करून त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत करावा, अशी आक्रमक मागणी साके ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्षा पूनमताई तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. 

निलेश पाटील यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, यामागे मोठे षडयंत्र असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. तपासात कोणतीही दिरंगाई किंवा दबाव न येता या प्रकरणातील सर्व बाबींची अत्यंत बारकाईने व निष्पक्षपातीपणे तपासणी करावी, असा आग्रही सूर यावेळी ग्रामस्थांनी लावून धरला.

संशयितांचे सीडीआर आणि तांत्रिक पुरावे तपासल्यास या मृत्यूचे गूढ तात्काळ उकलू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरातील कठोर कारवाई करावी आणि निलेश पाटील यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने यावेळी देण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes