SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावाहैदराबाद येथील भारत समिट मध्ये आमदार सतेज पाटील यांचा सहभागकोल्हापूर महापालिकेच्यावतीने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जिमवर सीलची कारवाईखाकी वर्दीतले संवेदनशील मन! हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत साजरी केली भाऊबीजबालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहहरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांकनिलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोपगांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच...! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा : आमदार राजेश क्षीरसागरमानवतेचा संदेश देणारा जागतिक दयाळूपणा दिन

जाहिरात

 

खाकी वर्दीतले संवेदनशील मन! हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत साजरी केली भाऊबीज

schedule13 Nov 26 person by visibility 82 categoryसामाजिक

कोल्हापूर : कर्तव्याची कठोर धुरा सांभाळत असतानाही पोलिसांच्या अंगातील माणूस कसा जिवंत असतो, याचे एक सुंदर उदाहरण हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घालून दिले आहे,. दिवाळीसारख्या सणात कुटुंबापासून दूर राहावे लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाऐवजी शिरोळ तालुक्यातील निमशरगाव येथील 'आई' वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करत एक आगळावेगळा संदेश दिला आहे.

▪️कर्तव्यापायी दिवाळीत कुटुंबापासून दुरावा
हातकणंगले तालुक्यातील पट्टणोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्याच्या बंदोबस्ताची मोठी जबाबदारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यावर होती. या महत्त्वाच्या शासकीय कर्तव्यामुळे त्यांना दिवाळी सणाला आपल्या घरी कुटुंबाकडे जाता आले नाही. मात्र, ड्युटीच्या व्यस्ततेतून वेळ काढत त्यांनी समाजातील निराधार घटकांसोबत सण साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

▪️मातांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य
सणासुदीच्या काळात स्वतःच्या मुलांची आणि कुटुंबाची उणीव भासणाऱ्या वृद्धाश्रमातील आजी व मातांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हाके यांनी 'आई' वृद्धा्रशमाला भेट दिली. या कौतुकास्पद उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील मातांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

▪️खाकी वर्दीतील भावाचे औक्षण आणि फराळाचे वाटप
वृद्धाश्रमातील मातांनी मोठ्या मायेने आणि लाडाने खाकी वर्दीतील या लाडक्या भावाचे औक्षण केले. या भावनिक क्षणी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सर्व मातांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि साड्या भेट देत दिवाळी गोड केली. या आगळ्यावेगळ्या भाऊबिजेमुळे संपूर्ण परिसरात सत्यवान हाके यांच्या संवेदनशील स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अप्पाराव कांबळे आणि वृद्धाश्रमाचे संजय भोसले हे देखील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes