SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावाहैदराबाद येथील भारत समिट मध्ये आमदार सतेज पाटील यांचा सहभागकोल्हापूर महापालिकेच्यावतीने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जिमवर सीलची कारवाईखाकी वर्दीतले संवेदनशील मन! हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत साजरी केली भाऊबीजबालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहहरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांकनिलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोपगांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच...! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा : आमदार राजेश क्षीरसागरमानवतेचा संदेश देणारा जागतिक दयाळूपणा दिन

जाहिरात

 

बालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह

schedule13 Nov 26 person by visibility 83 categoryराज्य

◼️जिल्ह्यात जनजागृतीसह विशेष तपासणी मोहीम; बालकामगार आढळल्यास आस्थापना चालकांवर कायदेशीर कारवाई : सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे

कोल्हापूर : बालकामगार प्रथेचे निर्मूलन करून बालकांना शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपणाचा हक्क मिळवून देण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यात कामगार विभागामार्फत जनजागृती आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये बालकामगार कामावर ठेवू नयेत, यासाठी जनजागृतीपर स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. तसेच माहितीपत्रकांचे वाटप करून बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील कायदेशीर तरतुदींबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.

वीटभट्ट्या, खडीक्रशर, हॉटेल्स, दुकाने, चहाच्या टपऱ्या, गॅरेज यांसह विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामगार विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत बालकामगार आढळल्यास संबंधित बालकांची मुक्तता करून आस्थापनाचालकांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी हॉटेल असोसिएशन, दुकानदार व व्यापारी संघटना, औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ तसेच महाराष्ट्र बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व विनियमन) (पहिली सुधारणा) नियम, २०२५ मधील तरतुदी, दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर परिणाम यांची माहिती देण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजक, आस्थापनाचालक आणि नागरिकांना बालकामगार कामावर न ठेवण्याची सामूहिक शपथ देण्यात येणार आहे. बालपण हे शिक्षण, आरोग्य आणि आनंदासाठी आहे; कामासाठी नाही. त्यामुळे बालकामगारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. कोणत्याही आस्थापनेत बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित कामगार कार्यालयास माहिती द्यावी आणि बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes