SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्नशिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्षसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटनRIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढनाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथनसमरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथन

schedule08 Apr 26 person by visibility 136 categoryसामाजिक

कोल्हापूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मजयंती द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कोल्हापूर शहरात शनिवार, ११ एप्रिल रोजी एका भव्य 'ओबीसी जागृती परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जुना बुधवार पेठ येथील अभिषेक लॉन, ब्रह्मपुरी येथे ही परिषद पार पडणार आहे. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत बाबुराव गुरव, यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष  चौधरी विकास पटेल  भूषवणार आहेत. ओबीसींचे आरक्षण, जातीनिहाय जनगणना आणि ओबीसी समाजापुढील ज्वलंत समस्यांचे निराकरण कसे करता येईल, यावर या परिषदेत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या महत्त्वपूर्ण परिषदेमध्ये ओबीसी जन मोर्चाचे  दिगंबर लोहार , शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य  राजेंद्र कुंभार, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी  प्रेमराज बोबडे आणि बामसेफ (नवी दिल्ली) चे उपाध्यक्ष  व्ही. बी. जाधव हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

ओबीसी समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes