SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्नशिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्षसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटनRIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढनाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथनसमरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन

schedule08 Apr 26 person by visibility 104 categoryराज्य

◼️8 ते 14 एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक 8 ते 14 एप्रिलदरम्यान विभागातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा तसेच जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी बिंदू चौक येथे करण्यात आले. 

आज गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामार्फत गावस्तरावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, बाबासाहेबांचे महिलाविषयक कार्य व संत गाडगे महाराजांचे सामाजिक कार्य या विषयावर प्रा. डॉ. जगन कराडे यांचे समाज कल्याण कार्यालय येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय विभागाकडील शिष्यवृत्ती व इतर योजनांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात समाज कल्याण कार्यालय वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायं. 5 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 वाजता आरोग्य विभागाशी समन्वय साधून ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता महिला मेळावा व संविधानावर आधारित डॉ. रुपा कुलकर्णी, श्रीमती सुनंदा मेटकर यांचे जाहीर व्याख्यान समाज कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सायं. 5 वाजता सत्यशोधक मूकनायकांचा विचार "काल, आज आणि उद्या" या विषयावर रवींद्र खैरे यांचे जाहीर व्याख्यान शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील 4 शासकीय वसतिगृहामध्ये सचिन परब, सचिन कांबळे, सुरेखा डवर, अनुराधा कांबळे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 वाजता समाज कल्याण कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वाजता श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण, पुणे व विविध शासकीय अधिकारी यांची औद्योगिक संस्था मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

मंगळवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बिंदू चौक येथे संविधानिक मूल्यांवर आधारित पथनाट्याचे आयोजन. सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महामानवांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes