SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्कमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपरीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालकनॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजनराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' पुरस्कारघरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मीकोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध

जाहिरात

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार; कोते आदिवासी आश्रमशाळेत विद्यापीठाचा स्कूल कनेक्ट उपक्रम

schedule09 Feb 26 person by visibility 158 categoryसामाजिक

कोल्हापूर : पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 कोल्हापूर, दि. ९ फेब्रुवारी: पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes