SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्कमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपरीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालकनॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजनराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' पुरस्कारघरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मीकोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध

जाहिरात

 

परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक

schedule09 Feb 26 person by visibility 112 categoryराज्य

▪️मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

मुंबई : इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत कॅमेरे नसलेल्या केंद्रांची संख्या 58 वरुन 11 इतकी कमी झाली असल्याची माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक व सर्व कर्मचारी अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नियुक्त करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

मुंबई विभागीय मंडळाच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पत्रकार सभेत इ. 12 वीच्या 58 परीक्षा केंद्रांची माहिती कळविण्यात आली होती. तरी केंद्र संचालक, परीरक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्या सभा घेऊन त्यात त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित करण्यात आले. सद्यस्थितीत बहुतांश परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची  पूर्तता केल्यामुळे सदर परीक्षा केंद्रांच्या संख्येत बदल होऊन कॅमेरे उपलब्ध नसणारी केंद्र संख्या 58 वरुन 11 वर आलेली आहे, अशी माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes