SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्कमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपरीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालकनॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजनराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' पुरस्कारघरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मीकोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध

जाहिरात

 

जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule09 Feb 26 person by visibility 113 categoryराज्य

• इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पत्राद्वारे शुभेच्छा

• स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून परीक्षा देण्याचे आवाहन

• जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची पाळत, तर काही ठिकाणी ड्रोनद्वारेही नजर

 

कोल्हापूर : उद्यापासून (१० फेब्रुवारी) जिल्ह्यामध्ये १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर २० फेब्रुवारीपासून १० वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा प्रशासनाकडून पत्राद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा दक्षता समिती यांनी 'कॉपीमुक्त अभियान' बैठकीतून जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत. 

 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना अनुराधा म्हेत्रे, एस.पी. बडे, डॉ.राजेंद्र भोई उपस्थित होते.

 

यावर्षी जिल्हा प्रशासनाने 'कॉपीमुक्त अभियान' अतिशय प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले असून, जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याचबरोबर विशेष बैठे व भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशा केंद्रांच्या परिसरात ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. सर्व सीसीटीव्ही यंत्रणेचे गट शिक्षण अधिकारी स्तरावर सनियंत्रण केले जाणार आहे. कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष, सीसीटीव्ही, व्हीडीओ कॅमेरा, ड्रोन अशा विविध माध्यमांतून आढळून येणाऱ्या प्रकारांवर कारवाई करीत गैरप्रकारात सहभागी विद्यार्थी, पर्यवेक्षक, कॉपी पुरवणारा यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर गैरप्रकार होणाऱ्या केंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे. 

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, परीक्षा हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे; त्यामुळे कोणताही ताण न घेता शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जा. तुमची वर्षभराची मेहनत नक्कीच फळाला येईल. त्यांनी पालकांनाही विनंती केली आहे की, मुलांवर अवाजवी दडपण टाकू नका. त्यांना वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळेल याची काळजी घ्या. तसेच, कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका किंवा परीक्षाविषयक अफवांवर विश्वास ठेवू नका.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes