SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

घरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

schedule23 Oct 26 person by visibility 342 categoryमहानगरपालिका

◼️थकीत करापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने घरफाळ्याची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक ४, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरातील लघु दशरथ बुचडे यांच्या दोन गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आले. या गाळ्यांची एकूण थकबाकी १ लाख २२ हजार १८० रुपये आहे.

त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय क्रमांक १, गांधी मैदान अंतर्गत घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने जवाहरनगर, सुभाषनगर, साळोखेपार्क आणि रविवार पेठ परिसरात थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन वाणिज्यिक आणि दोन निवासी अशा एकूण पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईदरम्यान थकीत घरफाळ्यापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल करण्यात आले.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

यामध्ये कर अधीक्षक अर्चना प्रभावळे, दत्तप्रसाद माजगावकर, लिपिक सागर सुतार, सुदर्शन घाटगे तसेच उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes