SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. हे अभिनव आंदोलन करण्यात येणार२४ ऑगस्टला यंदा युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस ‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...कोल्हापूर महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली, पुष्पचक्र अर्पणनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एक राखी जवानासाठी उपक्रमास प्रतिसादभास्करराव जाधव वाचनालयाच्या विविध शाखांमध्ये सभासद नोंदणीस सुरुवात; मुख्य शाखेत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात प्रवेश सुरुकोल्हापूरच्या 'माधुरी बेकरी' ने जपलाय ऐतिहासिक वारसा...!अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला देणार चालना : पालकमंत्री प्रकाश आबिटकरअनियमितता आढळलेल्या १२ परवान्यावर कोल्हापूर कृषी विभागाची कारवाई; अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा

जाहिरात

 

२४ ऑगस्टला यंदा युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस

schedule09 Aug 25 person by visibility 184 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. 

स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाईल. यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. 

पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फुड पॅकेट वितरीत केले जातेे. त्यामुळं गोविंदांच्या भोजनाची सोय भागीरथी संस्थेकडून केली जाते. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विशेष सुरक्षेचे उपाय केले जातील. त्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य आहे. शिवाय एखादा गोविंदा जखमी झाल्यास, त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे आणि हिल रायडर ऍडव्हेंचरचे कार्यकर्ते सज्ज असतील. तसेच सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असेल. दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर सर्व गोविंदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धाही आयोजित केली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना अनुक्रमे ७, ५ आणि ३ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर यावर्षी तरूणाईच्या मागणीवरून युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे. सर्वोत्तम रिल्स बनवणार्‍यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिले जातील. प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृितक कार्यक्राम सादर होईल. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून, स्पर्धेचे आयोजन होणार आहे.


दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर, युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. डिजे रणजितसह, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल.

 युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून, भाजप आणि युवाशक्तीचे सुमारे २५० कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी २४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes