SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवालगोकुळच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात चुकीचा संदेश पसरविणाऱ्या निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कडक कारवाई करामानवतेचा आधारस्तंभ: जागतिक रेड क्रॉस दिवसडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणारविद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलकृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरअधिकाऱ्यांनो, जनतेचा अंत पाहू नका; २७ जूनपर्यंत पाणी न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे!पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आमदार यड्रावकर यांना निवेदनके.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल

जाहिरात

 

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणार

schedule07 May 26 person by visibility 284 categoryशैक्षणिक

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल  उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.

यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडली होती. राज्यभरातील ९ विभागीय मंडळांमधून (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठ दिवस लवकर लागत आहे.

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल:
 * mahresult.nic.in
 * sscresult.mkcl.org
 * sscresult.mahahsscboard.in

या निकालासोबतच विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण पाहता येणार असून, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes