SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
10 वी पुरवणी परीक्षा जून-जुलैसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूपश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीरविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथअद्वितीय पराक्रमाचा जळजळता इतिहास: छत्रपती संभाजी महाराजपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमाएमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्दमुश्रीफांचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आवाहन: कर्जमाफीची वाट न पाहता मुदतीत कर्ज फेडा!छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरखुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा : मंत्री प्रकाश आबिटकरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

जाहिरात

 

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

schedule13 May 26 person by visibility 252 categoryराज्य

◼️मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द
◼️अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको
◼️बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश
◼️  मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश

मुंबई : इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल. मंत्री-अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा. अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.

 ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes