SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
10 वी पुरवणी परीक्षा जून-जुलैसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूपश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीरविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथअद्वितीय पराक्रमाचा जळजळता इतिहास: छत्रपती संभाजी महाराजपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमाएमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्दमुश्रीफांचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आवाहन: कर्जमाफीची वाट न पाहता मुदतीत कर्ज फेडा!छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरखुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा : मंत्री प्रकाश आबिटकरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

जाहिरात

 

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमा

schedule13 May 26 person by visibility 284 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात.

 पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी बुधवारी सहा.आयुक्त स्वाती दुधाने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव ढोणे, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, नंदकुमार पाटील, प्रकाश लोंढे, सुरज घुणकीकर, महेश भोसले व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली.

 या दानपेटीमध्ये रु.4,19,675/- व ऑनलाईन स्वरुपात 2,30,109/- अशी एकूण 6 लाख 49 हजार 784 इतकी रक्कम जमा झालेली आहे.

यापुर्वी माहे मार्च 2025 मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.1 लाख 61 हजार 537 इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती. स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes