SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दिवाळीच्या आनंदात सामाजिक भान जपत चेतना, स्वयंम् व सिद्धगिरीच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची खरेदी करा; मान्यवरांचे आवाहनमान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!जागतिक शाकाहारी दिन: आरोग्याचा आणि दयाळूपणाचा संदेशभूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती ‘शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख’ प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवसबस्तवाड येथील आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणीउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल : एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरीराज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

उच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडे

schedule31 Oct 26 person by visibility 327 categoryशैक्षणिक

◼️कोरे अभियांत्रिकीमध्ये ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे’ या विषयावर चर्चासत्र

वारणानगर  : उच्च शिक्षण संस्थांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यावे. समाजासमोरील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सशक्त संशोधन संस्कृती विकसित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. महादेव के. लोखंडे यांनी केले.

वारणा विद्यापीठाची मुख्य घटक संस्था असलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या  रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आणि इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. 

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.

डॉ. लोखंडे यांनी आयआयटी मद्रास येथील पदव्युत्तर शिक्षण, मुंबई विद्यापीठातून मिळवलेली डॉक्टरेट आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्समधील ३५ वर्षांहून अधिक अनुभवाच्या आधारे संशोधनाचे महत्त्व विशद केले. ओआरटी, जीएमआरटी आणि लायगो-इंडिया या वैज्ञानिक प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी पेटंट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधनिबंधांवर भर देण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी  एन. एच. पाटील यांनी ग्रामीण व औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या संशोधनाची गरज अधोरेखित केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी संशोधनासाठी जिज्ञासा, सातत्यपूर्ण वाचन आणि चौकस विचार आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, अधिष्ठाता संशोधन आणि नवोपक्रम, डॉ. राहुल काजवे, डॉ. कल्पना पाटील, डॉ .ए. एस. शेरीकर, प्रा. ए. आर. चौगुले, सरिता लोखंडे, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती घाटगे आणि अदिती पाटील यांनी केले, तर प्रा. सुभाष कोळी यांनी परिचय व आभारप्रदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes