SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दिवाळीच्या आनंदात सामाजिक भान जपत चेतना, स्वयंम् व सिद्धगिरीच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची खरेदी करा; मान्यवरांचे आवाहनमान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!जागतिक शाकाहारी दिन: आरोग्याचा आणि दयाळूपणाचा संदेशभूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती ‘शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख’ प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवसबस्तवाड येथील आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणीउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल : एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरीराज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरी

schedule31 Oct 26 person by visibility 399 categoryमहानगरपालिका

◼️सभापती सत्यजित जाधव यांची माहिती ; विद्यार्थिनींचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टळणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना मंजूर करण्यात आलेल्या केएमटीच्या सवलत पास वापरण्यास अखेर मान्यता देण्यात आली आहे. या पासचा वापर करून संबंधित विद्यार्थिनींना केएमटी बसमधून प्रवास करता येणार असून, यामुळे विद्यार्थिनींच्या मोफत प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी दिली.

महिला व बालकल्याण समितीच्या ठरावानुसार के.एम.सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४७ केएमटी सवलत पास तयार करण्यात आले होते. मात्र, या योजनेला परिवहन समितीची अंतिम मान्यता नसल्याने ३० ऑक्टोबर रोजी परिवहन उपक्रमाने महाविद्यालयाला पत्र पाठवून मान्यता मिळेपर्यंत पासचा वापर करू नये, असे स्पष्ट केले होते. यावरून महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि परिवहन विभागातील समन्वयाचा अभाव तसेच परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला होता.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, हा मुद्दा प्राधान्याने विचारात घेऊन सभापती सत्यजित जाधव यांनी परिवहन समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही या प्रकरणी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करून माफी मागितल्याची बाब विचारात घेण्यात आली. त्यानंतर कोणताही कटुता किंवा प्रशासकीय वाद न वाढविता विद्यार्थ्यांच्या हितासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय झाला. परिवहन समितीच्या सभापती व सदस्यांनी पास वापरण्यास परवानगी देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्यानंतर परिवहन विभागाकडून संबंधित पास वापरण्यास मान्यता देण्यात आली.

याबाबत सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव म्हणाले, "विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे किंवा त्यांच्यावर आर्थिक भार पडणे योग्य नाही. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काही प्रशासकीय बाबींवर मतभेद असू शकतात; मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होता कामा नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परिवहन समितीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना मंजूर सवलत पासचा वापर करता यावा, यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भविष्यात अशा योजना राबविताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करणे आवश्यक आहे."

परिवहन समितीच्या या निर्णयामुळे ४७ विद्यार्थ्यांच्या प्रवास सुविधेचा प्रश्न मार्गी लागला असून, प्रशासकीय प्रक्रियेतील मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका सभापती जाधव यांनी घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes