SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दिवाळीच्या आनंदात सामाजिक भान जपत चेतना, स्वयंम् व सिद्धगिरीच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची खरेदी करा; मान्यवरांचे आवाहनमान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!जागतिक शाकाहारी दिन: आरोग्याचा आणि दयाळूपणाचा संदेशभूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती ‘शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख’ प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवसबस्तवाड येथील आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणीउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल : एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरीराज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

schedule31 Oct 26 person by visibility 316 categoryआरोग्य

◼️राज्याच्या आरोग्य विभागाचे काम देशात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील
◼️आरोग्य सेवेत सेवा रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा आशेचा किरण होईल
◼️सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण

कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे फित कापून लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर, महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एल. कदम, कृष्णा डायग्नोस्टिकचे कार्यकारी अध्यक्ष आदर्श कर्नावत तसेच नगरसेवक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, उपलब्ध निधीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य संवाद यात्रा सुरु करण्यात येत आहे. आरोग्य सेवांमधील त्रुटींबाबत नागरिकांना ऑनलाइन तक्रार करता यावी, यासाठी विशेष ॲप सुरु करण्यात आले आहे.

 लोकसहभागातून हे काम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत आहे. देशभरात राज्याच्या आरोग्य विभागाचे काम दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मंत्री  आबिटकर म्हणाले, कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाच्या वतीने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सेवा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन आणि अत्याधुनिक लॅब अशा विविध सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. यासोबतच कॅन्सर निदान आणि उपचार सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग आणि कॅथलॅब सुरु करण्याचे नियोजन आहे. मोफत व माफक दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी सीपीआर रुग्णालयाबरोबरच सेवा रुग्णालयही पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण बनेल. तसेच या रुग्णालयात लाईन बाजार, बावडा आणि कदमवाडी परिसरातील नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील सुविधांवर नियमित देखरेख ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोल्हापुरात यलो फिव्हर लसीकरणाची सुविधाही सुरु करण्यात आली असून, आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मित्रा संस्थेच्या सहकार्याने शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. तसेच २०० बेडचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० बेडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पालकमंत्री  आबिटकर यांनी सांगितले.

खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सेवा रुग्णालयात अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. या सुविधांचा उपयोग कसबा बावडा, कदमवाडी परिसरासह जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होईल. भविष्यातही आणखी दर्जेदार सुविधा या रुग्णालयाला दिल्या जातील. या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजेश क्षीरसागर म्हणाले, गोर गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या आणि उपचार करुन घ्यायचे असले तर हजारो, लाखो रुपयांचे कर्ज घ्यावे लागत होते. सेवा रुग्णालयात उपलब्ध होत असलेल्या या अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ कसबा बावडा व जिल्ह्यातील नागरिकांना निश्चित होईल. मित्रा या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

 शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पालकमंत्री प्रकाश आबिटकर करत आहेत, असे सांगून यापुढेही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा महापौर रुपाराणी निकम यांनी केल्या.

सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सेवा रुग्णालयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या रुग्णालयाला पूर्व द व्हिक्टोरिया डायमंड जुबली हॉस्पिटल या नावाने संबोधले जात होते. या इमारतीची पायाभरणी 18 जून 1897 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाली होती. सध्या रुग्णालयात बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भुलतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्य चिकित्सक, भुलतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी आदी कार्यरत आहेत.

या रुग्णालयात यलो फीवर व्हॅक्सिनेशन सेंटर, क्रिटिकल केअर युनिट, कॅथलॅब, 50 बेड रुग्णालयाचे 200 बेड रुग्णालयात श्रेणीवर्धन आदी सुविधा देण्यात येत आहेत. या रुग्णालयाच्या विस्तारामुळे गोरगरिबांना खाजगी रुग्णालयाच्या दर्जाचे उपचार आणि महागड्या चाचण्या आणि वैद्यकीय सुविधा विनामूल्य मिळणे सुलभ होणार आहे. शासकीय रुग्णालयात विविध दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणार असल्यामुळे हे रुग्णालय नागरिकांसाठी जीवनदायी ठरेल. "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून हे रुग्णालय विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes