SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफसंभाजीनगर बस स्थानक च्या नूतन नामफलकावर कोल्हापूर नावाचा समावेश करावा; शहरभान'ची मागणीसावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षितभाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणीशासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

जाहिरात

 

संभाजीनगर बस स्थानक च्या नूतन नामफलकावर कोल्हापूर नावाचा समावेश करावा; शहरभान'ची मागणी

schedule04 Mar 26 person by visibility 119 categoryराज्य

कोल्हापूर : येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या संभाजीनगर एस टी बस स्थानकाच्या मुख्य फलकावर 'कोल्हापूर' हे नाव लिहायचे राहून गेले आहे.
ही बाब 'शहरभान'च्यावतीने संभाजी नगर आगार व्यवस्थापक यांचे निदर्शनास आणून देण्यात आली.

कोणत्याही शहरांमध्ये जेव्हा बाहेरचे प्रवासी एस टी बसस्थानकावर पोहचतात तेव्हा तेथील नामफलकावरून आपण त्या शहरात आलेलो आहोत अशी माहिती त्यांना मिळत असते. मात्र कोल्हापूरच्या संभाजी नगर बसस्थानकावर पोहचल्यावर आपण नक्की कोल्हापूरातच पोहचलो आहोत काय..? असा संभ्रम प्रवाशाला पडावा अशी गोष्ट नकळतपणे संबंधित फलकामुळे होत आहे.

कारण फलकावर मोठ्या आकारात 'संभाजी नगर बसस्थानक' एवढाच उल्लेख आढळतो. त्यामुळे त्या फलकासमोर अथवा खालील बाजूस
'कोल्हापूर' असा ठळक शहराचाही उल्लेख करणे गरजेचे आहे.

कारण संभाजीनगर नावाचे वेगळे शहर आहे तर आपले हे संभाजीनगर बसस्थानक कोल्हापूरचे आहे.
ही बाब प्रवाशांना पटकन समजणे गरजेचे आहे. त्यांचे मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये. यासाठी 'कोल्हापूर' नावाचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

सदरचे निवेदन आगार व्यवस्थापक, संभाजीनगर बसस्थानक कोल्हापूर यांना 'शहरभान' च्या वतीने देण्यात आलेले आहे. असे पत्रक अमरदीप कुंडले यांनी प्रसिद्धीस दिले आहे..

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes