SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर'सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना'पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळकोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मान; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरवघोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थिती

जाहिरात

 

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफ

schedule22 May 26 person by visibility 92 categoryआरोग्यसामाजिक

  कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात -'कोल्हापूरचा श्वास' या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

  शेंडा पार्क येथील सभागृहात मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विभागाचा आज आढावा घेतला. ते म्हणाले, सीपीआर रुग्णालय हे जनतेच्या सेवेसाठी नवीन अत्याधुनिक व देखण्या स्वरूपात सुरू होत आहे. मुख्यमंत्री महोदयांची तारीख मिळाल्यानंतर याचे उद्घाटन करण्यात येईल. शेंडा पार्क येथे सुरू असलेले 125 निवासी स्त्री / पुरुष डॉक्टरांचे निवासी वसतीगृह, प्रत्येकी 150 मुला / मुलींचे वसतीगृह, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृह नूतनीकरण त्याचबरोबर MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच 150 नर्सिंग क्षमता असलेल्या होस्टेल व प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन हे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. सध्या कागल, उत्तुर, शेंडा पार्क त्याचबरोबर इतर ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी, रस्ता, वीज त्याचबरोबर एसटीपीची (सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट) कामे प्राधान्य करण्यात यावी असे निर्देश दिले.

  श्री. मुश्रीफ यांनी यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क, सीपीआर रुग्णालय, सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुरल ट्रेनिंग सेंटर तसेच उत्तुर येथे उभारण्यात येत असलेले योग व निसर्गोपचार महाविद्यालय आणि पिंपळगाव येथे सुरू असलेल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला.

  याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे, डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय अध्यक्ष डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ भाग्यश्री खोत, मनपाचे जल अभियंता हर्षदीप घाटगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी - कंत्राटदार उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes