SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर'सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना'पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळकोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मान; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरवघोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थिती

जाहिरात

 

कोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त

schedule22 May 26 person by visibility 223 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीची एक स्प्लेंडर बाईक विक्री करण्यासाठी तीन जण कळंबा परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार लखनसिंह पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने कळंबा येथे तात्काळ सापळा लावून साहिल शशिकांत म्हातुगडे (वय २१) आणि करण शिवाजी बचाटे (वय २१, दोघे रा. सोनाळी, ता. कागल) या दोन आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला (अल्पवयीन) ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी आणखी दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

 पोलिसांनी या कारवाईत २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या एकूण ४ मोटार सायकली हस्तगत केल्या असून यामुळे ३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली स्प्लेंडर (MH-09-CN-3219), गोकुळ शिरगाव हद्दीतील स्प्लेंडर (MH-09-BT-0716), शाहूपुरी हद्दीतील बुलेट (AP-28-BX-5527) आणि आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्वतःची ॲक्टिव्हा (MH-09-GY-9058) यांचा समावेश आहे.

पुढील तपासासाठी अटक केलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या तपास पथकाने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes