शासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
schedule22 May 26 person by visibility 91 categoryसामाजिक
कोल्हापूर : 4 मार्च 2015 पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण ( सुधारणा ) कायदा 1995 लागू करण्यात आला. या अधिनियमाने गाई, वळूचीं व बैलांची कत्तल करण्यास मनाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्यातील निकष पाळून जिल्ह्यात शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय राजर्षी शाहू सभागृहात आज आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रमोद बाबर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कत्तल खानाच्या अनुषंगाने डेटाबेस गोळा करण्यात यावा. तसेच नदी - नाल्यात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले. तर जिल्ह्यातीत 8 इंटर स्टेट बॉर्डर चेकपोस्टच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दिले.
या बैठकीसाठी डॉ.महेश शेजाळ सहआयुक्त (पशुसंवर्धन), डॉ .प्रशांत कुलकर्णी, डॉ प्रसाद भुतकर, डॉ. जितेंद्र पाठक, डॉ.रवींद्र जंगम, डॉ श्याम कोळेकर, डॉ. मंगेश खिलारे आदी उपस्थित होते