SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेशिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!'सहज सेवा ट्रस्ट'चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी 'अर्थ अवर'चे आयोजनमाती आधारित शिक्षणाने विश्वाचे कल्याण शक्य : मल्लिकार्जुन कोरी; केआयटी मध्ये कै.शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला संपन्न.

जाहिरात

 

'अपूर्वा' नगरात घुमला भक्तीचा गजर; चिमुकल्यांच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध!

schedule26 Mar 26 person by visibility 293 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूर येथील पाचगाव रोड परिसरातील अपूर्वा नगरामध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला रंगला बालकलाकारांच्या संगीत अविष्काराचा कार्यक्रम गजर भक्तीचा,

कृतीतून संस्कार हा मुख्य उद्देश असणाऱ्या या कार्यक्रमात अलंकार कला अकादमीच्या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, वादन कौशल्याने भक्ती गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या रुजलेले सोशल मीडियाचे भूत कमी करण्याच्या हेतूने कोल्हापुरातील काही सजक पालक सक्रिय आहेत व या सजग पालकांच्या कल्पनेतून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे सादरीकरण विना मोबदला शहराच्या विविध भागात केले जात आहे.

राम नवमीच्या या पूर्वसंध्येला या झालेल्या उपक्रमास परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत प्रामाणिक हेतूने व प्रयत्नाने सादर झालेल्या या संगीतमय सादरीकरणास लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पालक वेदा सोनुले, अमृता दैनी, अमृता गुळवणी आणि सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या सादरीकरणात सारंग सोनुले, मुक्ता गोगटे, दक्षि सामंत यांनी गायन केले. याला सुरेख अशी तबला व हार्मोनियमची साथ संगत अनुक्रमे सोहम जाधव व सुभान दैनिक यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरव गुळवणी याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिसरातील रहिवासी तेजस परांडेक,  कलाकार परिचय ईशान कुलकर्णी व आभार प्रदर्शन श्रीहरी कुलकर्णी यांनी केले. सहभागी श्रोत्यांनी या सर्व बालक कलाकारांचे तोंड भरून कौतुक केलेच व भविष्यातील प्रगतीसाठी त्यांना शुभाशीर्वाद दिले. रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामुळे भागातील वातावरण राममय झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes