SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेशिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!'सहज सेवा ट्रस्ट'चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी 'अर्थ अवर'चे आयोजनमाती आधारित शिक्षणाने विश्वाचे कल्याण शक्य : मल्लिकार्जुन कोरी; केआयटी मध्ये कै.शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला संपन्न.

जाहिरात

 

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule26 Mar 26 person by visibility 124 categoryराज्य

मुंबई  : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून फिलेरियासिसचा पूर्णतः नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,विशेषतः दुर्लक्षित असलेल्या फिलेरियासिससारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय 
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली होती. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम  महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाकडे  विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, भारतातून फिलेरियासिस निर्मूलन करण्याच्या   पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीतही  मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात, ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे, काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होते, त्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय फिलेरियासिस निर्मूलन शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील या आजाराचा प्रादुर्भाव हा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. 

सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया.
ट्रीपल ड्रग पॉलिसी ( आयडीए)  यशाचा दर:  नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक 
 टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes