SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्डगोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघातकोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीमकोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुलीकोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाईसमाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर

जाहिरात

 

देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघात

schedule07 Oct 26 person by visibility 180 categoryराजकीय

कोल्हापूर : निवडणूक आयोगाचा मनमानी कारभार, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरून काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपली चूक मान्य केल्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी त्यांनी केली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील शांततापूर्ण आंदोलन चिरडण्याचे काम भाजप करत असून, ज्ञानेश कुमार यांच्या चुकीमुळे १२ ते १५ कोटी जनता वेठीस धरली जात असल्याचे पाटील म्हणाले. 

तसेच भाजप नेते परिणय फुके यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या राजकीय कार्यकाळावर बोलताना, गुजरातपासून दिल्लीपर्यंत लोकशाही कशी संपवली याचाच उत्सव सध्या सत्ताधारी साजरा करत असल्याचे ते म्हणाले.


एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत रास्त असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिवाची घाईघाईने केलेली बदली या प्रकरणातील तथ्य दर्शवते, त्यामुळे संबंधित सचिवाने राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ७० हजार जागांच्या 'मेगा भरती'चे गाजर दाखवून सरकारने विद्यार्थ्यांच्या आकांक्षा वाढवल्या, मात्र सरकारची आर्थिक स्थिती ही भरती करण्याची नाही, असे सांगत सध्या सुरू असलेल्या परीक्षा तरी सुरळीत पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी हे देशातील तरुणांचा आवाज बनल्यामुळेच भाजपच्या पोटात दुखत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत बोलताना सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झाली असून उद्या संध्याकाळी चार वाजेपूर्वी आमचे पूर्ण पॅनेल घोषित केले जाईल. उमेदवारी माघारीची अफवा हे महायुतीने सोडलेले पिल्लू आहे. महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून चालत असल्याचा आरोप करत, "भविष्यात म्हशीची धार कधी काढायची, हेसुद्धा मुंबईतूनच ठरणार का?" असा खोचक सवाल त्यांनी यावेळी महायुतीला केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes