SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्डगोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघातकोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीमकोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुलीकोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाईसमाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर

जाहिरात

 

कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीम

schedule07 Oct 26 person by visibility 184 categoryमहानगरपालिका

◼️आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड व गटनेते आदिल फरास यांनी घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, रस्ते व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, गटनेते आदिल फरास यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता केली.

 या मोहिमेत मंदिर परिसर तसेच परिसरातील रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी तीन ट्रॉली व दोन टिप्परच्या सहाय्याने कचरा व कटिंगचा उठाव करण्यात आला. तसेच टेंबलाई मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रंकाळा परिसरात डी-मार्टसमोरील बाजूचा रस्ता व फुटपाथ स्वच्छ करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत खानविलकर पंप ते महावीर कॉलेज, सेवा रुग्णालय ते सर्किट हाऊस, पितळी गणपती ते डीएसपी चौक मेन रोड या परिसरात स्वच्छता करण्यात आली. यासोबतच प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत सायबर चौक ते शेंडा पार्क मेन रोड या मार्गावरही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 नवरात्रोत्सव काळात शहरातील प्रमुख धार्मिक व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत विशेष नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत 3 ट्रॉली कचरा व 2 टिप्पर प्लॅस्टीक गोळा करण्यात आले. यावेळी 1 जेसीबी, 3 ट्रॉली, 2 टिप्पर व 1 बुमच्या सहाय्याने ही मोहिम राबविली.

 हि स्वच्छता मोहिम सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पर्यावरण अभियंता, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक विनोद नाईक, मनोज लोट, अनिकेत सूर्यवंशी, सुरज घुणकीकर, आदित्य पवार, भूमी कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रकाश गवंडी, यांच्यासह मुकादम व महापालिका कर्मचा-यांनी राबविली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes