SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणदुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : आमदार सतेज पाटील यांचा इशाराडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात जागतिक न्यूमोनिया दिन: आरोग्याची काळजी आणि जनजागृतीची गरजराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरवभगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजनगुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीरकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळशिक्षण, क्रीडा व संघटनात्मक चळवळीचे दीपस्तंभ: आदरणीय डी. बी. पाटील सर!

जाहिरात

 

डीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात

schedule12 Nov 26 person by visibility 190 categoryराज्य

इचलकरंजी :  प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी डीकेटीईच्या राजवाडयामध्ये डीकेटीई, पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ व आपटे वाचन मंदीर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगणीत करणारा ‘स्वरदीपोत्सव’ मराठी गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. दिवाळी पाडव्या निमित्त राजवाडयावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला या सर्व अकर्षक रोषणाईने उपस्थितांना डोळयाचे पारणे फीटल्याची अनुभूती मिळाली.
चित्ताकर्षक पार्श्‍वभूमीवर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. कार्यक्रमानंतर राजवाडयावर लावलेल्या आकर्षक अशा विद्युत रोषणाई, पणत्यांनी व झुंबरांनी मुळातच सुंदर असलेला ऐतिहासिक राजवाडा अधिकच खुलला होता. दुपारी ४.३० ते ८.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमांस सुमारे हजाराहून अधिक रसिक श्रोते व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मराठी शास्त्रीय संगीत,भावगिते,भक्तीगीते,सिनेगीते यांची माहीती करुन देणारा हा कार्यक्रम इतका रंगला की, गिरीश कुलकर्णी व  त्यांच्या शिष्यांनी गायलेल्या विविध गाण्याच्या वेळी संपूर्ण श्रोतृवृंद गानसमाधीत बुडून गेला. अनिकेत अंमगणे, भार्गव कुलकर्णी, डॉ सतीश दातार, डी.डी. कुलकर्णी, रेवती गलगले, काजल तोडकर मृणाल देशपांडे, याज्ञी देशपांडे व शिवाजी लोहार तसेच डीकेटीईचे विद्यार्थी व बालवृंदानी यांनी आपली दर्जेदार गायनकला व वादनकला सादर करुन कार्यक्रमात रंगत भरली. तर मेंगलोरहून किरण हेगडे यांनी बासरी वादन करुन उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
या दीवाळी पाडव्याचे वैशिष्टये म्हणजे राजवाडयाच्या प्रांगणात साकारण्यात आलेला फिरता आकाशकंदील जो डीकेटीईच्या आयडिया लॅब व सिव्हील विभागामार्फत तयार करण्यात आलेला होता यावर साकारण्यात आलेले ऑलंपिक मधील गोल्ड मिडल्स तर शौर्याचे प्रतिक असणारा स्मित मच्छार यांचे छायचित्र व सामाजिक संदेश देणारे जल हे तो कल हे व वसुंधराचे छायाचित्र तर नुकताच डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला त्याचे छायचित्र यामुळे आकाशकंदील उठून दिसत होता.
कार्यक्रम संपल्यानंतर राजवाडयावर फटक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली यामुळे राजवाडयाचे सौंदर्य खुलून दिसत होते राजवाडयाचे नयनरम्य असे दृश्य पाहून उपस्थित सर्व श्रोते तसेच नागरिकांचे डोळयांचे पारणे फेडले गेले. कार्यक्रमाच्या आयोजनाबददल संगीत श्रोते व नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.


 सदर कार्यक्रमास डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी.सौंदत्तीकर, एस.डी.पाटील, अनिल कुडचे, संचालिका डॉ एल.एस. आडमुठे, उपसंचालक डॉ यु.जे.पाटील, आपटे वाचन मंदीरचे डॉ. सुजित सौंदत्तीकर, जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, व पदाधिकारी यांच्यासह पं बाळकृष्णबुवा मंडळाचे पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे यांची होती, विद्युत रोषणाई राजू हावळ यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes