SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणदुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : आमदार सतेज पाटील यांचा इशाराडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात जागतिक न्यूमोनिया दिन: आरोग्याची काळजी आणि जनजागृतीची गरजराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरवभगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजनगुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीरकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळशिक्षण, क्रीडा व संघटनात्मक चळवळीचे दीपस्तंभ: आदरणीय डी. बी. पाटील सर!

जाहिरात

 

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळ

schedule11 Nov 26 person by visibility 238 category

◼️दुष्काळाच्या संकटात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे - कृषिमंत्री

पुणे : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथे शेतकरी हणमंत बापुराव लावंड यांच्या घरी भेट देऊन शेतकऱ्यांसमवेत दिवाळीचा फराळ केला. दुष्काळाच्या संकटात राज्यशासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. भविष्यामध्ये पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी असो किंवा जनावरांचा चाऱ्याचा विषय असो  या सर्व बाबींमध्ये लगेच करावयाच्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपाययोजना निश्चितपणे हाती घेण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी  भरणे यांनी शेतकऱ्यांना दिली.

कृषिमंत्र्यांनी गाडीतून उतरताच शेतकरी लावंड यांच्या घरासमोरील गाईच्या गोठ्याकडे गेले. त्यांनी लावंड बंधूंकडून जनावरांची माहिती घेतली, तसेच चाऱ्याची व्यवस्था कशी केली हे विचारले असता घरचे थोडे असलेले संपूर्ण उसाचे पिक ठेवले असून आणि मका विकत घेतली जाते असे सांगितले. यावेळी  भरणे यांनी शेळ्यांच्या गोठ्याची तसेच कोंबड्यांचीही पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या घरातील सुवासिनींनी  भरणे यांचे औक्षण केले. यावेळी त्यांनी घरातील तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर सर्वांसोबत दिवाळी फराळ आणि पोहे घेतले.

◼️मी देखील शेतकऱ्याचा मुलगा

 भरणे म्हणाले, "मी राज्याचा कृषिमंत्री असलो तरी तुम्हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने तुमचे दुःख, या भागातले प्रश्न, अडचणी माहिती आहेत." ते पुढे म्हणाले, येणारे वर्ष सर्वांसाठी थोडे संकटाचे, अडचणीचे आहे. मात्र जून महिन्यापर्यंत पुरेल असे पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिथे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथे अर्ज केल्यावर लगेच टँकर देण्याची व्यवस्था करू. जिथे पाण्याचे स्रोत आहेत तिथे चारा पिके घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून चारा पिकाचे बियाणे देण्यात येत आहे. जनावरांच्या छावणीच्या बाबतीतही पुढच्या एक- दोन महिन्यात विचार करण्यात येईल.

◼️पाच हजारांचे अनुदान हे अग्रीम; पुढील काळात जास्तीत जास्त मदत करू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचीही आठवण आपल्या सर्वांना येत असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले. राज्य शासनाच्यावतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 हजार रुपये दिवाळीसाठी अग्रीम जमा करण्यात आले आहेत. परंतु, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तसेच  एसडीआरएफच्या माध्यमातून, शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

◼️जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी संधी
दुष्काळाचे संकट निश्चितच मोठे आहे, मात्र, भविष्यातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ही एक संधी म्हणून आपल्याला पाहावे लागेल. त्या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढणे, छोटे छोटे बंधारे करणे, सांडव्याची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येतील. रोजगार हमी योजनेतून या कामांसह पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील, जेणेकरून शेतमजुरांनाही रोजगार मिळेल. या संकटातून शेततळे असो ठिबक सिंचन असो अशा नवीन गोष्टी शिकण्याचाही प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. यावेळी कृषी विभागासह अन्य विभागाचे अधिकारी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes