SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजय

जाहिरात

 

​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"

schedule09 Jun 26 person by visibility 309 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्रातदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे अधिवेशन कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे १४ जून २०२६ रोजी होत आहे. या अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणे, विकास कामांमधील संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीने हे अधिवेशन होत आहे.अशी माहिती निवास उर्फ बापू लाड,किशोर जामदार प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विजयसिंह सावंत, संदीप सावंत, व्ही. के. पाटील, किरण माळी, निलेश पाटील, बी. एस. पाटील, विशाल पाटील, ऋतुराज पाटील, प्रशांत शेलार, सुनील नागराळे, सोहम दळवी, आदी उपस्थित होते.

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या महा अधिवेशनामध्ये संघटना बांधणी मार्गदर्शन, सार्वजनिक बांधकाम मार्गदर्शन, पाणीपुरवठा विभाग मार्गदर्शन, ग्रामविकास विभाग मार्गदर्शन, जलसंपदा व जलसंधारण विभाग मार्गदर्शन, नगरविकास विभाग मार्गदर्शन, सर्व विभागाचे प्रश्न, संघटनेचे ठराव आंदोलनाची दिशा ठरवणे अशा पद्धतीने दिवसभर अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजू बी कृष्णानी, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष  बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे महासचिव श्री. एम. ए. हकीम, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेदगे, प्रथीतयश कंत्राटदार  कौशिक देशमुख,  संजय मैद, सुबोध सरोदे,  प्रवीण उंबरकर आदी उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत.

 Lदिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये थकीत देयकांची बिले तात्काळ व पूर्णपणे बिले अदा करावीत, ई टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणावी, अनुभव निकष व आर्थिक निकष व्यवहार्य करावेत, कामाच्या दाराबाबत न्यायव्यवस्था निश्चित करावेत, कंत्राटदार विरोधी अटी व नियम रद्द करावेत, जीएसटी भरपाईचा लाभ तात्काळ  मिळावा, किमान दर्जाच्या कामासाठी कंत्राट रक्कम कपात थांबवावी, कंत्राटदारांना सन्मान व न्याय मिळालाच पाहिजे आदी मागण्या बाबत विचार विनिमय केला जाणार आहे. आणि आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

 या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्हा  गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन,कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ, कोल्हापूर जिल्हा शासकीय मटेरियल पुरवठा संघटना, सार्वजनिक बांधकाम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर, कोल्हापूर/सांगली हॉट मिक्स प्लॅट असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना कोल्हापूर आदी संघटना सहभागी होणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes