SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजय

जाहिरात

 

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजय

schedule08 Jun 26 person by visibility 260 categoryराज्य

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. महामंडळाच्या कारभारावर रंगकर्मींनी दाखवलेला विश्वास या निकालातून स्पष्ट झाला असून, विजय पाटकर व आनंद काळे यांच्या नेतृत्वाखालील ‘चित्रकर्मी पॅनेल’चा या निवडणुकीत दारुण पराभव झाला.

 कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मतमोजणीत समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी दीडशे ते दोनशे मतांच्या फरकाने बाजी मारली. या निवडणुकीत मेघराज राजेभोसले, सुशांत शेलार आणि वासू पाटील हे दिग्गज उमेदवार विजयी झाले आहेत, तर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक आनंद शिंदे आणि विजय खोचीकर हे बिनविरोध निवडून आले. निकाल जाहीर होताच समर्थ पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

 विजयानंतर बोलताना मेघराज राजेभोसले यांनी रंगकर्मींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला असून, महामंडळाचा कारभार यापुढेही पारदर्शकपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes