SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापूर पोलीस दलाची मोठी कामगिरी: पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेत वेग आणि आधुनिकीकरण

schedule08 Jun 26 person by visibility 190 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेषत अत्यंत कार्यक्षमतेने काम करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. १५ दिवसांच्या आत पूर्ण करून ती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवण्याचा जलद कारभार पोलीस दलाने सातत्याने सुरू ठेवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३० ते ३५ हजार पासपोर्ट अर्ज येतात. पोलीस प्रशासनाने या अर्जांची वेळेत पडताळणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. केवळ प्रक्रियाच वेगवान केली नाही, तर पोलीस ठाण्यांमधील पायाभूत सुविधांमध्येही मोठी सुधारणा केली आहे.

मागील दोन वर्षांतील पासपोर्ट पडताळणीची आकडेवारी:
 * सन २०२४: ३३,२३१ अर्ज
 * सन २०२५: ३५,४८२ अर्ज

केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या पासपोर्ट पडताळणी सेवाशुल्क निधीचा वापर करून कोल्हापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यांमध्ये नवीन संगणक, प्रिंटर आणि यूपीएसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नव्हे, तर १६ पोलीस ठाण्यांमध्ये पासपोर्ट कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचे बांधकामही युद्धपातळीवर सुरू आहे.

सन २०२६ मध्येही पोलीस अधीक्षक कार्यालयास १ कोटी १८ लाख ५९ हजार ५६८ रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी खर्च केला जाणार आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडले जात आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes