SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार

schedule10 Jun 26 person by visibility 117 categoryसामाजिक

कोल्हापूर  : ​महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील गरजू कुटुंबांना शालेय शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सलग १४ व्या वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, गेल्या १३ वर्षांपासून गरजू विद्यार्थी, नागरिक आणि अंधशाळा या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

 राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू विद्यार्थी व नागरिकांनी शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी मनसे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव, अतुल भालकर अभिजीत राऊत राहुल कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes