SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्नमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेटएमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहनशासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पणछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदीडॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभाजागतिक हिरोशिमा दिन: मानवी इतिहासातील काळा दिवस आणि शांततेचा संदेशवक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले; संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

जाहिरात

 

स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षण

schedule04 Aug 26 person by visibility 342 categoryराज्य

मुंबई : आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापलेल्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याला विशेष महत्त्व देण्याची गरज आहे.

 विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव, भावनिक असुरक्षितता तसेच वर्तणुकीतील बदलांची प्रारंभिक चिन्हे ओळखून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य मिळावे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांमधील अध्यापकांसाठी ‘मानससूत्र’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालय, येथे ‘मानससूत्र’ उपक्रमाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ समस्या निर्माण झाल्यानंतर समुपदेशन करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संस्थाव्यापी मानसिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांशी दैनंदिन संपर्कात असलेले अध्यापक विद्यार्थ्यांमधील वर्तणुकीतील किंवा भावनिक बदल सर्वप्रथम अनुभवतात. त्यामुळे मानसिक तणावाची प्रारंभिक लक्षणे ओळखणे, सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देणे आणि गरजेनुसार योग्य तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करणे, ही अध्यापकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी ‘मानससूत्र’ या महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये मानसशास्त्रीय पायाभूत संकल्पना, मार्गदर्शन व समुपदेशन, संकट व्यवस्थापन, डिजिटल स्वास्थ्य, समावेशक पद्धती तसेच भारतीय ज्ञान परंपरा यांची सांगड घालणारा बहुविद्याशाखीय दृष्टिकोन अवलंबण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव व असुरक्षिततेची प्रारंभिक चिन्हे ओळखण्याची अध्यापकांची क्षमता बळकट करणे, मार्गदर्शन, समुपदेशन, समवयस्क सहाय्य व निर्देशन यंत्रणा विकसित करणे, संकट ओळख, तात्काळ प्रतिसाद आणि हस्तक्षेपोत्तर काळजी यासाठी व्यावहारिक कार्यनीती उपलब्ध करून देणे, तसेच भावनिकदृष्ट्या सुरक्षित, समावेशक आणि भेदभावरहित महाविद्यालयीन व विद्यापीठ परिसर निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय अध्यापक विकास कार्यक्रम दि. १० ऑगस्ट २०२६ ते दि. १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

‘मानससूत्र’ उपक्रमाच्या पोस्टर अनावरणप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes