SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!कोरे अभियांत्रिकीत ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ कार्यक्रमाचा शुभारंभसी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वीडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेशआधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव: शिवाजी विद्यापीठात पार पडली ArcGIS Pro कार्यशाळाजैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापूर येथील बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य, शर्वरी कबनूरकर उपविजेती

schedule05 Oct 26 person by visibility 278 categoryक्रीडा

कोल्हापूर :  कै. दत्तात्रेय विठ्ठल जोशी यांचे स्मरणार्थ अनुज चेस अकॅडमीच्या वतीने बापूसाहेब साळुंखे सभागृह, कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अभिजीत खतकर व अरुण पाटील (टोपकर)यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आल.

स्पर्धेमध्ये एकूण 7  फेऱ्या घेण्यात आल्या.  सोहम खासबारदार व श्रीधर तावडे यांच्यातील सामन्यातील बरोबरीमुळे सोहम खासबारदारने 7 पैकी 6.5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. शर्वरी कबनूरकरने व्यंकटेश खाडेपाटील वर मात करत 7 पैकी 6 गुण  मिळवून उपविजेतेपद पटकाविले.  

◼️स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे-
खुला गट 
तृतीय क्रमांक श्रेयश गाताडे 6 गुण 
चौथा क्रमांक  अर्णव पोर्लेकर 6 गुण (प्रोग्रेसिव्ह)
पाचवा क्रमांक सूरज जाधव 6 गुण  (प्रोग्रेसिव्ह)
सहावा क्रमांक श्रीधर तावडे 6 गुण  (प्रोग्रेसिव्ह)
सातवा क्रमांक  व्यंकटेश खाडे पाटील 5.5 गुण 
आठवा क्रमांक  शशिकांत कबनूरकर 5.5 गुण
नववा क्रमांक ओजस व्हनमाने 5.5 गुण
दहावा क्रमांक हरीश पाटील 5 गुण 


◼️8 वर्षाखालील 
प्रथम क्रमांक  आरुष सणस 4 गुण
द्वितीय क्रमांक कृष्णराज चव्हाण 3.5 गुण 
तृतीय क्रमांक रियांश गिरगावकर 3 गुण 
चौथा क्रमांक श्रीनेय पालनकर 3 गुण 

◼️१० वर्षाखालील -
प्रथम क्रमांक रुद्रवीर पाटील 4 गुण 
द्वितीय क्रमांक संस्कार वनीरे 4 गुण
तृतीय क्रमांक भोईटे शरद 4 गुण

◼️12  वर्षाखालील -
प्रथम क्रमांक  ध्रुव गोयल 5 गुण
द्वितीय क्रमांक  श्रीतेज भाट 5 गुण
तृतीय क्रमांक रणवीर पुनुगडे 4 गुण
चौथा क्रमांक सक्षम नाटेकर  4 गुण

◼️14 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक  अद्विक विचारे  5 गुण
द्वितीय क्रमांक शौर्य कटके 5 गुण
तृतीय क्रमांक अर्जुन चौगुले 5 गुण
चौथा क्रमांक आयान शेख  5 गुण
सिनियर प्लेअर 
प्रथम क्रमांक मीना वरने 3 गुण
द्वितीय क्रमांक वंदना डोंगरे 3 गुण

◼️बेस्ट प्लेअर 
अथर्व कुंभार 5 गुण
◼️बेस्ट लेडीज 
अनुष्का पाटील 5 गुण
प्रियदर्शनी ठोमके 5 गुण
◼️अनुज् चेस ॲकॅडमी विजेते 
◼️प्रथम क्रमांक  सार्थक घुले  5 गुण
द्वितीय क्रमांक अवनीश तानुगडे 5 गुण
तृतीय क्रमांक शिवम साबळे 4 गुण
चौथा क्रमांक पार्थ सुतार 3 गुण

उत्तेजनार्थ बक्षिसे : प्रीशा पाटील, सर्वेश गुरव, पूर्वा सुतार, अभीज्ञ चौगुले, गुरुवीर लंबोरे, स्वयम पाटील, स्वराज पाटील शौर्य कांडेकरी, सईद पिंजारी 
अंजली चौगुले,  हर्षवर्धन पाटील, रोनक साळुंखे, वरद खोत, प्रथमेश गायकवाड

स्पर्धेमध्ये 16 मानांकित (फिडे रेटेड) खेळाडूंसह एकूण 106 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून शैलेश होनकट्टी, कपिल ठोंबरे, प्रियंका ठोंबरे, यांनी काम पाहिले. 
 स्पर्धेचे बक्षीस वितरण  श्रीकांत जोशी,  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, अनुज् चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक  बाबुराव पाटील,  काशिनाथ गुळवणी,  अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी  अनुष्का पाटील, अनुज पाटील, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes