SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!कोरे अभियांत्रिकीत ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ कार्यक्रमाचा शुभारंभसी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वीडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेशआधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव: शिवाजी विद्यापीठात पार पडली ArcGIS Pro कार्यशाळाजैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ कार्यक्रमाचा शुभारंभ

schedule05 Oct 26 person by visibility 206 categoryशैक्षणिक

वारणानगर : उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्वगुण, व्यावहारिक कौशल्ये आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन देण्यासाठी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर (२०२६-२७)’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. टॉप्से प्रोसेस सोल्यूशन, पुणेचे कार्यकारी संचालक संतोष सदावरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील आणि कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी होते. यावेळी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, आदामा इंडिया लिमिटेड, हैदराबादचे वरिष्ठ व्यवस्थापक शक्ती जाधव, रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पी. बी. देहनकर, कार्यक्रमाचे नियोजक प्रा. व्ही. ए. भोसले, डॉ. यू. बी. देशन्नावर यांच्यासह विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संतोष सदावरे यांनी ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ होण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नसून मूलभूत तांत्रिक ज्ञान, नेतृत्वक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची तयारी आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.

 महाविद्यालयात आत्मसात केलेले सैद्धांतिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील त्याचा प्रत्यक्ष वापर यातील संबंध त्यांनी स्पष्ट केला. अभियांत्रिकीच्या मूलभूत विषयांवरील भक्कम ज्ञान हे उद्योगातील प्रभावी कामगिरीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तांत्रिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या गरजा समजून घेत स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करावीत आणि बदलत्या स्पर्धात्मक वातावरणात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहनही सदावरे यांनी केले. यावेळी त्यांनी टॉप्से आणि संस्थेमधील सहकार्याच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

डॉ. पी. बी. देहनकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे अंतर्गत नियोजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रा. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes