SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!कोरे अभियांत्रिकीत ‘फ्युचर रेडी इंजिनिअर’ कार्यक्रमाचा शुभारंभसी. पी. आर. मध्ये एकाच दिवशी तीन TAVI प्रक्रिया यशस्वीडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेशआधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव: शिवाजी विद्यापीठात पार पडली ArcGIS Pro कार्यशाळाजैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!

schedule05 Oct 26 person by visibility 190 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तथापि शिक्षक / पदवीधर मतदार संघाची निवडणूक (विधान परिषद) आचार संहिता तसेच दुष्काळ सदृष्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी बैठकीत दिली .

 जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ते म्हणाले,नवरात्र कालावधी दरम्यान कोल्हापूर शहरात अंदाजे 30 ते 40 लाख भाविक व पर्यटक भेट देत असतात. हा उत्सव कोल्हापूरच्या संस्कृती आणि परंपरांचा महोत्सव असल्याने या महोत्सवाला देश तसेच जगभर मान्यता आहे.दि 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.कोल्हापूर दसरा महोत्सव 2026 अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक वेशभूषा, हस्तकला,चित्रकला, पर्यटन, निबंध,रांगोळी स्पर्धा,नागरिकांसाठी चित्रनगरीची सफर,महिलांची बाइक रॅली त्याचबरोबर कोल्हापूरची शौर्यगाथा आदी उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.

 या महोत्सवांतर्गत 11 ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार आहे.या महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि हा दसरा महोत्सव जगप्रसिद्ध करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. 

या बैठकीसाठी मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड , पोलीस अधीक्षक निलोत्पल ,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख , करमणूक तहसीलदार श्रीमती तेजस्विनी पाटील ,प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य.अभियंता क्रांतीकुमार मिरजकर ,मंदिर समितीच्या सचिव श्रीमती वर्षा साळोखे आदी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes