समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तर
schedule05 Oct 26 person by visibility 226 categoryउद्योग
राधानगरी : विरोधी पॅनेल प्रमुख २५-० असा निकाल लावून उमेदवार निवडून आणण्याची भाषा करत आहेत. मात्र, आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आमच्या आघाडी उद्देश उमेदवारांपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आम्ही समविचारी आघाडीकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला २५ रुपये दर वाढवून देणार आहोत, तसेच पशुखाद्याचे दरही कमी करून देणार आहोत. ही सत्ता मला वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर केवळ साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हवी असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले ते राधानगरी तालुक्यातील ठराव धारकांशी संवाद साधत होती.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने राधानगरी तालुक्यातील दूध संस्था ठरावधारकाच्या समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान म्हासुर्ली, केळोशी बुद्रुक, धामोड, कोते ,चांदे, राशिवडे, येळवडे, पुगाव, शिरगांव, कांबळवाडी, घुडेवाडी, कंथेवाडी, कसबा तारळे, गुडाळ, कुडुत्री, सोन्याची शिरोली, राधानगरी येथील ठरवा धारकांची बेैठक पार पडली.
यावेळी माजी सरपंच बापू भिसे, अशोक साळुंखे, विलास पाटील, अशोक पाटील, नामदेवराव जाधव, सरपंच रोगे वहिनी, नामदेव पाटील, मच्छिंद्र कांबळे, नितीन सोनवणे, मारुती तामकर ,सिताराम फडके, एल. एस. पाटील, तुषार बोडवे, विनायक कोरे, संदीप नलवडे, उपसरपंच सागर कांबळे, आनंदा धनवडे, विलास पाटील, लहू बिडकर, केरबा टिपकुर्ले, दगडू चौगुले, सुदर्शन कुरणे, बापू चौगुले, अवधूत गुंडप सरपंच रंगराव गुरव धनाजी गुरव, बंडा कोतेकर, गोते गुरुजी, राजू कोतेकर, नारायण बाणे, शामराव जाधव, विलास माने, ए. डी. पाटील सर, विश्वनाथ पाटील, रवींद्र पाटील, अशोक पाटील, पांडुरंग भांदिगरे, अशोकराव भांदिगरे, उमेश पवार, दिपक पाटील, सरपंच जयदीप पाटील, शहाजी रेडेकर, जयदीप मधुकर पाटील, निवास पाटील, संदीप बळप, सर्जेराव पाटील, पांडुरंग भांदिगरे, एकनाथ पाटील, अशोकराव साळोखे, चंद्रकांत चौगुले, साहील पाटील- कौलवकर, एम.जी. पाटील, सहदेव कांबळे दगडू चौगले, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, रघुनाथ पाटील, दगडू फाले, डॉ. केरबा जोगम, सदाशिव पाटील, संजय कांबळे, सर्जेराव चौगुले, शहाजी पाटील, दादू पाटील, धर्मा कांबळे, संजय सुतार, रवींद्र पाटील, रंगराव अस्वले, मारुती अस्वले यांची भेट घेतली
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, राज्यात आम्ही अनेक जिल्ह्यांत फिरतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याई असल्याने आपल्याकडला ग्रामीण जनतेचा ऊस आणि दूध यावरती आर्थिक व्यवस्था चालत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना व ग्रामीण जनतेला दर दहा दिवसांनी थेट पैसे देणारी एकमेव भक्कम आर्थिक व्यवस्था आपल्याकडे आहे. अशी व्यवस्था इतर कोणत्याही जिल्ह्यात पाहायला मिळत नाही. 'गोकुळ' दूध संघाचा मल्टीस्टेट प्रस्ताव उधळून लावण्यापासून ते शेतकऱ्यांना खरा न्याय देण्यापर्यंत आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आगामी काळात गोकुळमध्ये एकमुखी नेतृत्वाला सत्ता द्यावी असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
विरोधी पॅनेल प्रमुख २५-० असा निकाल लावून उमेदवार निवडून आणण्याची भाषा करत आहेत. मात्र, आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आमच्या आघाडीचा मुख्य उद्देश उमेदवारांपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला २५ रुपये दर वाढवून देणार आहोत, तसेच पशुखाद्याचे दरही कमी करून देणार आहोत. असं प्रत्युत्तर विरोधकांना यावेळी दिले तसेच ही सत्ता मला वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर केवळ साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचा प्रयत्न राहील आम्ही कधीही स्वार्थासाठी राजकारणात आलो नाही माझा यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही मात्र जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा गोकुळ राहिला पाहिजे नाहीतर महायुती कडे गेला तर अमूल दूधसंघाकडे आयता जावू शकतो अशी भिती यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
स्मार्ट मीटर योजना, दुष्काळग्रस्तांना मदत, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि शेतीपंपांच्या पाणीपुरवठ्याबाबत फेडरेशनच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरून लढलो आहोत. याच भूमिकेतून गोकुळ दूध संघातही एकमुखी सत्ता आणण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा.
यावेळी कांबळवाडीचे शहाजी रेडेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, "गोकुळ दूध संघ टिकवण्यासाठी आणि आमच्यासारख्या दूध उत्पादकांच्या भविष्यासाठी आमदार बंटी पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या महायुद्धासारख्या राजकीय भांडणांमुळे भविष्यात गोकुळच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी शक्यता वाटत नाही, म्हणूनच आम्ही सतेज पाटील यांना पाठिंबा देत आहोत. तसेच तारळे गावचे सरपंच रवी पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटीचे सदस्य शिवाजी पाटील यांनीही विचार मांडले. "गेल्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे काम पाहूनच आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे," असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पाटील यांच्या पॅनेलला विजयाच्या शुभेच्छा दिल्या
गुडाळ गावाचे महादेव कोथळकर यांनी सांगितले की राधानगरी तालुक्यातील ठराव धारकांच्या तुमच्या लढवया नेत्या बरोबर आहे. आम्ही ए वाय पाटील ग्रुपचे असलो तरी सध्याची परिस्थिती पाहता आम्ही गोकुळ टिकावा यासाठी तुमच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार राजू बाबा आवळे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, अभिजीत तायशेटे, सदाशिव चरापले, परिषद सदस्य सागर धुंदरे , ए.डी पाटील, पंचायत समिती अमृता पाटील, रवींद्र पाटील, विश्वनाथ पाटील, ए,डी चौगुले, सुशील पाटील कौलवकर, रमेश बचाटे, चंद्रकांत चौगुले, धीरज डोंगळे,सरपंच संदीप डवर यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.