SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी थरार: महासत्ता चौकातील फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना २४ तासांत बेड्या!कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यातपर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसटी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये : वीरेंद्र दीक्षितछत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी : प्रकाश आबिटकरछत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता

जाहिरात

 

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजन

schedule05 Mar 26 person by visibility 102 categoryराज्य

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ अंतर्गत आजरा तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता मधील नवीन तरतुदींची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे तसेच नागरिकांना एकदिवसीय सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने ७ मार्च ते १५ मे या कालावधीत राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपरिषद व नगरपंचायत पातळीवर हे अभियान राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

शिबिरांचे आयोजन पुढीलप्रमाणे-
शनिवार, ७ मार्च : आण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कूल, शनिवार, १४ मार्च : गवसे, रवळनाथ मंदिर, शुक्रवार, १० एप्रिल : मलिग्रे, मलिकअर्जुन मंदिर, शुक्रवार, १७ एप्रिल : उत्तूर, महादेव मंदिर, शुक्रवार, १५ मे : प्रशासकीय हॉल, तहसिल कार्यालय,आजरा

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ, उत्पन्न, रहिवास व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, घरकुलासाठी पत्रे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक तसेच पी.एम. किसान नोंदणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes