SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी थरार: महासत्ता चौकातील फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना २४ तासांत बेड्या!कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यातपर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसटी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये : वीरेंद्र दीक्षितछत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी : प्रकाश आबिटकरछत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू

schedule05 Mar 26 person by visibility 211 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. 

तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 8 मार्च  रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 20 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण , प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes