SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनपात्र झोपडपट्टीधारकांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दया; एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात प्रथमच बॉयलर अटेंडंट डिप्लोमा; डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कौशल्याधारित शिक्षणाचा नवा पर्यायग्रामीण महाराष्ट्रातून जागतिक फुटबॉलच्या शिखरापर्यंत अंजू तुरंबेकर यांची झेप!कोल्हापूर शहरासह लगतच्या १३ गावांतील विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश; कोल्हापूरच्या हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा समावेश“महापौरपद हे कोल्हापूरच्या विकासाचे माध्यम; मला अधिक कालावधी मिळाल्यास शहराला ‘इंदूर’सारखे बनवण्याचा प्रयत्न करेन” : महापौर रूपाराणी निकमदुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावनामराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा ऐतिहासिक दीपस्तंभ

जाहिरात

 

गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना

schedule19 Nov 26 person by visibility 236 categoryराज्य

मुंबई : गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान मोठे आहे, अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. 

गडहिंग्लजमध्ये गेली वीस दिवस तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या तीव्र भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून पोहोचवल्या होत्या.                        

मुंबईत महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जंजिरा या निवासस्थानी महायुती समन्वय समितीच्या बैठकीस मंत्री  मुश्रीफ उपस्थित होते.  

​आज मुंबईतील 'जंजिरा' शासकीय निवासस्थानी आयोजित महायुती समन्वय समितीच्या बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.  
​दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर कामाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. तसेच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा केली.  

​या बैठकीस राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे, उद्योग मंत्री  उदय सामंत यांच्यासह समन्वयक  सुधीर देऊळगावकर, आशिष कुलकर्णी आणि आ.  संजय खोडके उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes