SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनपात्र झोपडपट्टीधारकांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दया; एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात प्रथमच बॉयलर अटेंडंट डिप्लोमा; डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कौशल्याधारित शिक्षणाचा नवा पर्यायग्रामीण महाराष्ट्रातून जागतिक फुटबॉलच्या शिखरापर्यंत अंजू तुरंबेकर यांची झेप!कोल्हापूर शहरासह लगतच्या १३ गावांतील विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश; कोल्हापूरच्या हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा समावेश“महापौरपद हे कोल्हापूरच्या विकासाचे माध्यम; मला अधिक कालावधी मिळाल्यास शहराला ‘इंदूर’सारखे बनवण्याचा प्रयत्न करेन” : महापौर रूपाराणी निकमदुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावनामराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा ऐतिहासिक दीपस्तंभ

जाहिरात

 

दुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ

schedule19 Nov 26 person by visibility 189 categoryराज्य

◼️दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीयच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा                   
 ◼️वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
◼️राज्यातील ३०५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ 

​मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाची ८ लाख रुपयांची मर्यादा लागू न करता सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून, यामुळे आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात किंवा परीक्षेत कोणताही अडथळा येणार नाही.  


सन २०२६ च्या खरीप हंगामात मदत व पुनर्वसन विभागाने सुरुवातीला २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ निकषांच्या आधारे राज्यातील एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.  
​
या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट न लावता परीक्षा शुल्क माफी मिळेल. यासोबतच आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीसी), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनाही या शुल्क माफीचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  

□ ३७.९२ कोटींच्या शुल्काचा भार.....
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या हिवाळी सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे मिळून १ लाख ६ हजार ३०८ विद्यार्थी परीक्षेस पात्र आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी सुमारे ३७.९२ कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षित आहे. विद्यापीठाचा परीक्षा आयोजनाचा मोठा खर्च लक्षात घेऊन शासनाने या आर्थिक बाबींचा विचार करून हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागातील भावी डॉक्टरांना मोठा आधार मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes