SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणारजिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

जाहिरात

 

विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहिती

schedule04 Feb 26 person by visibility 196 categoryसामाजिक

कोल्हापूर  : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत  रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक लक्षवेधी आणि समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा  अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी सौ. अरूंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. त्यामध्ये विकासवाडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेले वृक्षारोपण, रोटरीच्या वतीने प्रथमच राबवलेला आषाढी वारीचा आणि प्रसाद वाटपाचा उपक्रम, कारगील विजय दिवस साजरा करून शहीदांच्या कुटूंबियांचा केलेला सन्मान, बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन, कळंबा जेल मधील कैद्यांसाठी राबवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम,  प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वृध्दाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक स्पर्धा, गाण्यांचा कार्यक्रम,

जिल्हयातील नवोदित फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा, वयात येणार्‍या मुलींना आरोग्यासह परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे जिल्हयातील सुमारे १५ हून अधिक शाळांमध्ये आयोजन, तसेच विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिनचे वितरण, शालेय वयात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निमर्ाण व्हावी, यासाठी केटीएस स्पर्धेचे जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये आयोजन, त्यामध्ये १६०० मुलांचा सहभाग, त्यातून प्रथम आलेल्या २०० मुलांना स्कॉलरशिपसह बक्षिसं, ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ऍक्युपेंचर तज्ञ डॉ. सुनिता सातारकर, अच्युत गोडबोले, तसेच आदिवासी आणि जंगली भागात राहणार्‍या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणार्‍या अनघा पुरंदरे आणि पर्यावरणप्रेमी, पक्षी मित्र किरण पुरंदरे तसेच सीमेवरील युध्दात जखमी होवूनही जोरदार पुनरागमन करत, जलतरण स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७६ मेडल्स मिळवलेल्या चंदू चॅम्पियन फेम अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर यांच्यासह विविध नामवंत आणि तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आणि शिबीराचे आयोजन, शिक्षक दिनानिमित्त जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, रोटरी क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून, प्रथमच महिला संघाचा सहभाग, आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन,  त्यामध्ये सुमारे ६० महिलांची तपासणी, तसेच गरजू महिलांना सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी करता यावी, यासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान, निगवे खालसा गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम, रक्तदान शिबीराचे आयोजन, महिलांवरील अत्याचाराबाबत प्रतिबंधात्मक कायद्याचे मार्गदर्शन, त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांचे मार्गदर्शन, रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन, रोटरी इंटरनॅशनलकडून विविध प्रकल्प राबवण्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश, रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक  आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान, दिव्यांगासाठी कदमवाडी मध्ये जयपूर फुटचे वितरण, जिल्हयातील गाेरगरीब आणि गरजू १०० महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप, असंडोली गावामध्ये मुलींसाठी शौचालये बांधून देण्याच्या कामासाठी मदत, प्रयास या उपक्रमांतर्गत समाजात तंटा, वाद, मतभेद संपुष्टात येवून एकोपा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषत: १ कोटी १३ लाख रूपयांच्या ग्लोबल गॅ्रंट करण्यात क्लबला यश आले.

 अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे.

या पुरस्कारामुळे वर्षभर अतिशय नियोजनबध्द रितीने आणि पूर्ण समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे चिज झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. पत्रकार परिषदेला रोटरीचे सचिव विकास राऊत, बी एस शिंपुकडे, अनिरूध्द तगारे, ऍड. अनिल देशपांडे, भारती नायक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes