मतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदी
schedule04 Feb 26 person by visibility 119 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे, विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अथवा कोणत्याही व्यक्ती/राजकीय पक्ष/संस्थांनी गावातून किंवा शहरातून मिरवणूक/रॅली काढणे, डीजे किंवा डॉल्बी सिस्टीम लावणे, मोटार सायकलचे सायलेन्सर काढून वाहन चालविणे,
सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके लावणे/फोडणे यास मनाई करण्यात आली आहे.