SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणारजिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

जाहिरात

 

6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी

schedule04 Feb 26 person by visibility 99 categoryराज्य

कोल्हापूर :   जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावण्यासाठी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे.

मतदान कर्तव्याकरिता नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरून निवडणूक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्य घेऊन मतदान पथकांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत *सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या शाळांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

तसेच ज्या शाळेतील (प्राथमिक व माध्यमिक) *सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झालेली नाही*, त्या शाळा शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्या परिपत्रकानुसार शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने निवडणूक मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes