SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतमहिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चितऊसतोड मजूर आणि साखर कारखाने दोघांनाही मिळणार न्याय; खा. धनंजय महाडिक यांनी सुचवला सुवर्णमध्य!‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट : नामदार हसन मुश्रीफशेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"

जाहिरात

 

महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृह

schedule15 Mar 26 person by visibility 212 categoryराज्य

◼️कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ
कोल्हापूर  : कोल्हापुरात येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला सुरुवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला.

 साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळं पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. तसेच विविध संस्था संघटनांकडून याबाबत आवाज उठवण्यात आला होता.

 कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान २५ वर्षाची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी प्रयत्न केल्यानंतर, राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून आज कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कातील एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. ताराबाई पार्क इथल्या स्वच्छतागृहाच्या पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, नगरसेविका पल्लवी देसाई, माधुरी नकाते, कौसर बागवान, संगीता खाडे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहराच्या विविध विकास कामांसाठी यापुढे देखील निधी उपलब्ध होणार असल्याचं, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. तर कोल्हापुरात अशा पद्धतीनं महिला स्वच्छतागृह उभारण्यास सुरुवात झाली असून, यापुढे देखील प्रवासी, पर्यटक, भाविक आणि शहरवासीयांसाठी विविध सेवा सुविधा देणार असल्याचे महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितले. 

यावेळी विश्वजीत पवार, जयेश पाटील-घरपणकर, अजिंक्य जाधव, भूषण कानकेकर, दर्शन मराठे, वल्लभ देसाई, शितल तिरुके, तेजश्री पार्टे, अश्विनी गोपुगडे यांच्यासह महिला आणि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची पार्किंगची व्यवस्था बिंदू चौकात आहे. तर तिथून जवळच असलेल्या खासबाग मैदान इथं स्वच्छतागृह उभारणीची मागणी लक्षात घेवून या कामाचा शुभारंभ प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक,  अरुंधती महाडिक, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, नगरसेवक आदिल फरास यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे विविध प्रकोष्ठचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान कोल्हापुरातील रंकाळा  टॉवरच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेतही महिला स्वच्छतागृहाच्या कामाचा शुभारंभ झाला. इथं कृष्णराज महाडिक,  अरुंधती महाडिक, नगरसेविका माधवी गवंडी, नेहा तेंडुलकर, दीपा ठाणेकर, रेखा उगवे, शिवतेज खराडे, हेमंत कांदेकर, संग्रामसिंह जरग, सचिन पवार, सुरज साखरे, विरेंद्र हरुगले, किरण नकाते, गणेश चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी सुदर्शन सावंत, अमित शिंदे, विश्वास पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes